मुंबई - दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देशभरातील विद्यार्थ्यांकडून समर्थन मिळायला लागले आहे. देशातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन नागरिकता संशोधन कायद्याला विरोध करत आहेत. यानंतर देशात शांतता राखण्याचे आवाहन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यावर अभिनेत्री रेणूका शहाणेने रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"खरी 'तुकडे तुकडे गँग' तुमचा आयटी सेल आहे", रेणूकाचे मोंदींना 'थेट' उत्तर - Narendra Modi latest news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्य स्थितीमध्ये द्वेष पसरू नका अशा आशयाचे आवाहन जनतेला ट्विटद्वारे केले होते. याला रिट्विट रेणूका शहाणे यांनी केलंय. "खरी 'तुकडे तुकडे गँग' तुमचा आयटी सेल आहे", असे तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सद्य स्थितीबद्दल ट्विटमध्ये लिहिले होते, ''शांतता, एकता आणि बंधूभाव जपण्याचा हा काळ आहे. सर्व प्रकारच्या अफवा आणि खोट्या प्रचारापासून दूर राहण्याचे आवाहन आपल्याला करीत आहे. अशा शब्दात मोदी यांनी लोकांना आवाहन केले होते.''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिट्विट करीत रेणूका शहाणेने लिहिलंय, ''सर तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासून दूर राण्याचेही सर्वांना सांगा. ते सर्वात जास्त अफवा आणि खोट्या गोष्टी पसरवीत आहेत आणि पूर्णपणे शांतता, एकता आणि बंधूभाव याच्या विरोधात आहेत. खरी 'तुकडे तुकडे गँग' तुमचा आइटी सेल आहे.'' कृपया त्यांच्यापासून द्वेष पसरवणे थांबवा. रेणूकाच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.