मुंबई- 'शुभमंगल ज्यादा सावधान' या नव्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मीडियाकर्मी उपस्थित होते.
'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा दुसरा भाग येत आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळेल.