मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीतीने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला 'द गर्ल ऑन द सिटी' हा चित्रपट ८ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा 'दिल बेचारा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे परिणीतीच्या चित्रपटाला या चित्रपटाची टक्कर बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना यंदाचा 'तन्वीर सन्मान पुरस्कार' जाहीर