महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पावनखिंडीतला थरार जिवंत करणाऱ्या 'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच - Jangjauhar Marathi movie

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्यापुढे उलगडणार आहेत.

poster launch of 'Jangjauhar' movie
'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच

By

Published : Jul 11, 2020, 5:37 PM IST

मुंबई - अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. पावनखिंडीतल्या या रक्तरंजित संघर्षाला आता ३५० हून अधिक वर्षे उलटून गेलीत. हा शिवकाळ पुन्हा जिवंत करणं अतिशय आव्हानात्मक होतं. त्यासाठी आवश्यक भव्य सेट्स, अतिशय अवघड साहसदृश्ये आणि तांत्रिक कौशल्य यांची मोट बांधणं जिकीरीचं होतं. हे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने नेहमीच्या अभ्यासू वृत्तीने आणि मेहनतीने उचलले आहे.

हेही वाचा - भेदभाव करणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनेला मान्यता देऊ शकत नाही : अदिती राव हैदरी

'जंगजौहर' सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच

आधीच्या सिनेमांच्या अद्भुत अनुभवामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह सुमारे २१ कलाकार दिसणार आहेत. लहानपणापासून ऐकलेला पावनखिंडीतील दिव्य पराक्रमाचा इतिहास पडद्यावर अनुभवणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जंगजौहर’ चित्रपटाचे चित्रिकरण संपवून लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. ज्या दिवशी हा रक्तरंजित इतिहास घडला तो दिवस होता १३ जुलै १६६० आणि आज त्याच तारखेला या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details