मुंबई -बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट तयार होत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळते. सध्या अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरत आहेत. नव्या दमाच्या कलाकारांनाही मागे टाकत त्याचे चित्रपट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. पुढच्या वर्षीदेखील त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ईदच्या मुहूर्तावर त्याच्या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे.
सलमान खानचे चित्रपट आणि ईदचा मुहूर्त हे त्याच्यासाठी यशाचं गमक ठरलं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा चित्रपट हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र, यावेळी त्याच्या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या चित्रपटाशी होणार आहे.
हेही वाचा -VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स