महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इमरान हाश्मीच्या 'द बॉडी' चित्रपटाचं पहिलं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित - Emraan hashmi in the body film

इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री शोभिता धूतिपाला आणि वेदिका यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. शोभिता या चित्रपटात इमरान हाश्मीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

इमरान हाश्मीच्या 'द बॉडी' चित्रपटाचं पहिलं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित

By

Published : Nov 18, 2019, 8:52 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी सस्पेन्स थ्रिलर असलेल्या 'द बॉडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील पहिलं रोमॅन्टिक गाणंही रिलीझ करण्यात आलं आहे.

ऑर्को, तुलसी कुमार यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचे लिरिक्स आर्कोचेच आहेत.

हेही वाचा -व्हायरल झालेल्या व्हिडिओत डान्स करणाऱ्या 'या' चिमुकल्याला ओळखलं का?

इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री शोभिता धूतिपाला आणि वेदिका यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. शोभिता या चित्रपटात इमरान हाश्मीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

'द बॉडी' हा एक स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. दिग्दर्शक पॉलो यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता हिंदी रिमेकही त्यांनीच बनवला आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी ३०७ ए', अभिनेता सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

ABOUT THE AUTHOR

...view details