हैदराबाद:तेलुगू अभिनेता मेगा स्टार चिरंजीवी (Mega star Chiranjeevi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: अभिनेता चिरंजीवी यांनी दिली आहे. चिरंजीवी यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.
अभिनेता चिरंजीवी (Telugu actor Chiranjeevi) यांनी ट्विट केले आहे की, 'सर्व सावधानता बाळगून देखील मंगळवारी रात्री कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि मी आयसोलेशन मध्ये आहे. मागील काही दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. आपल्या सर्वांना लवकरच भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.'