मुंबई - मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने यंदाची नवरात्री अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. दरदिवशी देवीच्या विविध रुपातून तिने समाजातील गंभीर विषयांवर भाष्य करत आपल्या पोस्ट शेअर केल्या आहे. तिने शेअर केलेल्या या अनोख्या फोटोंचं नेटकरीही कौतुक करत आहेत.
तेजस्विनीने आत्तापर्यंत कोल्हापूरचा पूर, नैसर्गिक आपत्ती, ध्वनी प्रदूषण, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, व्यसन, पर्यावणाराचा ऱ्हास, आरे परिसरातील वृक्षतोड यांसारख्या विषयावर प्रकाश टाकत आपली व्यथा मांडली आहे.