मुंबई- 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेली तेजश्री प्रधान सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अशात आता तेजश्रीचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवरून याबद्दलची माहिती दिली.
तेजश्री प्रधानचं फेसबुक अकाऊंट हॅक, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती - हॅकर
माझं अधिकृत फेसबुक पेज ज्याला निळ्या रंगाची टीक आहे, ते हॅक झालं आहे. त्यामुळे, या अकाऊंटवरून काहीही पोस्ट केली गेली तर सावध राहा. ती मी केलेली नसेल. मी या हॅकरविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तेजश्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हॅकरचा सामना करण्याची ही तेजश्रीची दुसरी वेळ आहे. याआधीही एकदा तिचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं होतं. दरम्यान जान्हवीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या तेजश्रीनं ती सध्या काय करते या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर अग्गंबाई सासूबाई मालिकेतून सध्या ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.