मुंबई -मालिका, नाटक आणि मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'बबलू बॅचलर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. तिने कोणताही गाजावाजा न करता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ती एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्रीने शर्मन जोशीसोबत लिपलॉक किस दिला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा - तब्बल १० वर्षांच्या विश्रांतीनंतर सुष्मिता सेनचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन