मुंबई- अभिनेता सुर्या शिवकुमार यांच्या 'जय भीम' या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. तमिळ भाषेत असलेला हा टिझर मागास असलेल्या आदिवासी समाजाच्या छळाची व्यथा मांडताना दिसतो. यात सुर्या शिवकुमार आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या वकीलाच्या भूमिकेत दिसत आहे.
'जय भीम' हा चित्रपट अन्यायाविरुध्द लढा पुकरणाऱ्या समाजाची कथा आहे. समाजात काही जातींना वाळीत टाकले जाते, त्यांच्यावर चोर समजून अत्याचार केले जातात. अशा लोकांसोबत पोलीस अत्यंत क्रूरपणे वागतात. वकीलाच्या भूमिकेत असलेला सुर्या शिवकुमार केवळ पोलिसांच्या विरोधात आपला लढा उभारत नाही तर संपूर्ण व्यवस्था आणि सत्ताधारी यांना आपले लक्ष्य बनवतो. अंगावर शहारे आणणारे काही प्रसंग टिझरमध्ये पाहायला मिळातात.