हैदराबाद - आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण यात दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय.
'सैरा नरसिम्हा रेड्डी'मध्ये अमिताभचा करारी लूक, टिझरची प्रतीक्षा सुरू - Chiranjivi
'सैरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा पहिला टिझर येत्या २० तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवीसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटाचा पहिला टिझर येत्या २० तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी, कन्नड सुपरस्टार के सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.