महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पोहोचली 'सूर्यवंशी'ची टीम, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि सुनील शेट्टी यांनीही सहभाग घेतला होता.

Team Sooryavanshi in Maharashtra Police International Marathon, Akshay Kumar attends Maharashtra Police Marathon, Ajay Devgn attends Maharashtra Police Marathon, Rohit Shetty attends Maharashtra Police Marathon, Sooryavanshi film news, Sooryavanshi film latest news
महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पोहोचली 'सूर्यवंशी'ची टीम, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

By

Published : Feb 9, 2020, 1:14 PM IST

मुंबई -महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने आयोजित आतंरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये खिलाडी कुमार अक्षय कुमार, अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या तिघांनी सहभाग घेतला होता. अक्षयने तिघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयची मुख्य भूमिका आहे. तर, अजय देवगन देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगनने देखील हा फोटो शेअर केला आहे. अजयने रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखालीच तयार झालेल्या 'सिंघम' चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली होती.

महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि सुनील शेट्टी यांनीही सहभाग घेतला होता. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस खात्याकडून 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल १७ हजार स्पर्धकांनी भाग घेतला असून यात महाराष्ट्र पोलीस खात्यातील ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा -पोलिसांची मॅरेथॉन : मुंबईत 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'चे आयोजन

मुंबईतील कुलाबा येथील गेट वे ऑफ इंडिया पासून ते वरळी सी लिंक येथून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया अशा ४२ किलोमीटरच्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉनसह २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

'सूर्यवंशी' या चित्रपटात अक्षय कुमार देखील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सिंबा' चित्रपटात त्याची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details