वयाची साठी ओलांडल्यानंतर हाती धरली बंदूक, 'ही' आहे शूटर दादीची रिअल लाईफ - bhumi pednekar
चंद्रो आणि प्रकाशी या दोघींनीही उतारवयात आपल्या करिअरला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. अलिकडेच तापसी पन्नुने सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर दोघीही लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 'सांड की आँख' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्या दोघीही शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. दोघींनीही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने वुमन चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्याबद्दलही प्रेक्षक जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
चंद्रो आणि प्रकाशी या दोघींनीही उतारवयात आपल्या करिअरला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. अलिकडेच तापसी पन्नुने सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये चंद्रो आणि प्रकाशी यांची मुलाखत पाहायला मिळते. वयाची साठी पार केल्यानंतर आम्ही शूटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांची खिल्लीदेखील उडवली गेली. मात्र, या दोघीही त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.