महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मिशन मंगल' नंतर तापसी बनणार 'रश्मी रॉकेट', मोशन पोस्टर प्रदर्शित - रॉनी स्क्रुवाला

'मिशन मंगल' चित्रपटात तापसीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता ती 'रश्मी रॉकेट' चित्रपटात रेसच्या ट्रॅकवर धावताना दिसणार आहे.

'मिशन मंगल' नंतर तापसी बनणार 'रश्मी रॉकेट', मोशन पोस्टर प्रदर्शित

By

Published : Aug 30, 2019, 10:59 AM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नु अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल' चित्रपटात झळकली. आता ती तिच्या दुसऱ्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती 'रश्मी रॉकेट' या चित्रपटातही झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

'मिशन मंगल' चित्रपटात तापसीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता ती 'रश्मी रॉकेट' चित्रपटात रेसच्या ट्रॅकवर धावताना दिसणार आहे. मोशन पोस्टरमध्येही ती गावातल्या मैदानावरुन थेट रेसींग ट्रॅकवर धावताना पाहायला मिळते.

तापसीने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करुन 'रश्मी रॉकेट'ला भेटण्यासाठी तयार राहा, असे कॅप्शन दिले आहे. तर, अभिनेता अक्षय कुमारनेही या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करुन तापसीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -सत्तेसाठी नात्यांचा गळा गोठणाऱ्या राजकारणाची कथा, 'प्रस्थानम'चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शन अकर्ष खुराना करत आहेत. तर, रॉनी स्क्रुवाला आणि नेहा आनंद हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
तापसी लवकरच 'सांड की आँख' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती शार्प शूटर दादीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details