महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तापसी पन्नुच्या 'गेम ओव्हर'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित - social media

'गेम ओव्हर' हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी एका आजाराने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळतेय. काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा प्रभाव तिच्यावर पाहायला मिळतो. त्यामुळे ती भयभीत असते.

तापसी पन्नुच्या 'गेम ओव्हर'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

By

Published : May 30, 2019, 3:33 PM IST

मुंबई -अभिनेत्री तापसी पन्नु 'बदला' चित्रपटानंतर 'गेम ओव्हर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होती. आता या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

'गेम ओव्हर' हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी एका आजाराने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळतेय. काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा प्रभाव तिच्यावर पाहायला मिळतो. त्यामुळे ती भयभीत असते. यालाच 'अॅनीव्हर्सरी रिअॅक्शन' असे म्हटले गेल आहे. यामध्ये एखादी घटना घडलेल्या दिवशी पुन्हा आठवून त्या व्यक्तीला त्याची भीती वाटू लागते. हिच भूमिका तापसीने या चित्रपटात साकारली आहे.

'गेम ओव्हर' चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. १४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचेही प्रमाणपत्र मिळाले आहे. अश्विन सारावान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, एस. शशिकांत यांनी निर्मिती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details