मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या हजरजबाबीसाठीदेखील ती ओळखली जाते. सोशल मीडियावर ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. यावेळी मात्र, तिने कंगनाची बहीण रंगोलीवर निशाणा साधला आहे. वरुण धवनच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना तिने रंगोलीची फिरकी घेतली.
तापसीने साधला रंगोलीवर निशाणा, वरुण धवनच्या ट्विटवर 'अशी' दिली प्रतिक्रिया - social media
तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांचा 'सांड की आँख' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर अलिकडेच प्रदर्शित झाला. या टीजरची प्रशंसा करत वरुण धवनने एक ट्विट केले आहे.
तापसीने साधला रंगोलीवर निशाणा, वरुण धवनच्या ट्विटवर 'अशी' दिली प्रतिक्रिया
तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांचा 'सांड की आँख' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर अलिकडेच प्रदर्शित झाला. या टीजरची प्रशंसा करत वरुण धवनने एक ट्विट केले आहे. यात त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानीचे कौतुक केले.
त्याच्या या ट्विटवर तापसीने लिहिले की, 'अरे वरुण, तू फक्त दिग्दर्शकाचेच आभार मानले. आमची नावं तर लिहिलीच नाही'. तिच्या या प्रतिक्रियेला रंगोलीच्या ट्विटचे प्रत्युत्तर मानले जात आहे.