महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भारतात बलात्कार हा साथीच्या रोगाप्रमाणे फोफावतोय - तनुश्री दत्ता - nana patekar

तनुश्रीने उन्नाव बलात्कार घटनेबाबत आपले मत मांडताना म्हटले, की 'आपला महान देश भारत हा बलात्काराच्या घटनांनी ग्रासत चालला आहे. एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे या घटना बळावत चालल्या आहेत'.

भारतात बलात्कार हा साथीच्या रोगाप्रमाणे फोफावतोय - तनुश्री दत्ता

By

Published : Aug 5, 2019, 8:27 PM IST

मुंबई -अभिनेत्री तनुश्री दत्ता #MeToo मोहिमेद्वारे चांगलीच चर्चेत आली होती. तिने नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावले होते. तिने त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, नानांना या प्रकरणात क्लिन चीट मिळाली. या प्रकरणामुळे तनुश्री माध्यमांच्या प्रसिद्धी झोतात आली. आता पुन्हा एकदा तिने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

तनुश्रीने उन्नाव बलात्कार घटनेबाबत आपले मत मांडताना म्हटले, की 'आपला महान देश भारत हा बलात्काराच्या घटनांनी ग्रासत चालला आहे. एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे या घटना बळावत चालल्या आहेत'.

'भारतीय लोकांना आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपले डोळे उघडा आणि तो काळोख दूर करा जो आपल्या राष्ट्राला बुडवत आहे'. 'बलात्कार, डिप्रेशन, ड्रग्स आणि आत्महत्या हे युवा पिढीला कमजोर बनवत आहेत', असेही ती म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details