महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मराठी भाषेतही प्रदर्शित होणार 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज - sharad kelkar in tanhaji

तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित आहे. आपल्या प्राणाजी बाजी लावून त्यांनी कोंढाणा गड सर केला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. आता मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tanhaji the unsung warrior will release in marathi version
मराठी भाषेतही प्रदर्शित होणार 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

By

Published : Dec 6, 2019, 11:20 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर', हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित आहे. आपल्या प्राणाजी बाजी लावून त्यांनी कोंढाणा गड सर केला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. आता मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


१० जानेवारीला मराठी भाषेतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, १० डिसेंबरला मराठी ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'शाब्बास तेलंगाणा पोलीस', ऋषी कपूर यांनी ट्विट करून केलं अभिनंदन


ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अजय देवगनसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोलच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.

'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर'

हेही वाचा -'नेट प्रॅक्टिस' लघुपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक, 'लाईट दिस लोकेशन' महोत्सवात मारली बाजी

ABOUT THE AUTHOR

...view details