मुंबई - आगामी ऐतिहासिक चित्रपट 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ट्रेलरपासून ते यातील गाण्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. खऱ्या आयुष्यात पती-पत्नीची जोडी असलेले काजोल आणि अजय देवगन बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यावर चित्रित झालेले 'माय भवानी' हे गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होते.
अजय - अतुल यांच्या जोडीने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर, सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे. या चित्रपटात अजय देवगन हा तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर, काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांवर हे गाणं साकारण्यात आलं आहे. या गाण्यात काजोलचा मराठमोळा लूक पाहायला मिळतो. सोशल मीडियावरही तिच्या या मराठमोळ्या लूकची चर्चा आहे.
हेही वाचा -अमरावतीत राज्य नाट्य स्पर्धेची रंगत; 'आता पास' नाटकाने प्रेक्षक भावुक