मुंबई - अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांवर छाप पाडली. प्रदर्शनानंतर एकाच आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी प्रयत्न केले होते. कोंढाणासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न देखील बाजुला ठेवले होते. तानाजींची हीच शौर्यकथा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा -'तान्हाजी'नंतर 'या' शार्टफिल्ममध्ये झळकणार काजोल, फर्स्ट लुक प्रदर्शित
पहिल्या दिवशी या चित्रपटाने १५.१० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार मिळून २०.५७ आणि २६.२६ कोटींचा गल्ला जमवत अर्धशतक गाठले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात या चित्रपटाने १०७ कोटींचा व्यवसाय केला आहे.