मुंबई -अजय देवगनचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर बाजी मारण्यास सुरुवात केली होती. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ट्रेलरवर प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या १५ दिवसात या चित्रपटाने २०० कोटी कमाई करून नव्या वर्षात पहिला विक्रम रचला आहे.
यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर 'छपाक' आणि 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' चित्रपटांमध्ये तगडी शर्यत पाहायला मिळाली. या शर्यतीतून तान्हाजीने भरारी घेत बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवायला सुरुवात केली होती. आठवडाभरातच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई करून या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा -३५० चित्रपटात रांगडी भूमिका करणाऱ्या या खलनायकाला ओळखलंत का?