मुंबई -अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून आतुरता आहे. ट्रेलरनंतर तर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातलं 'शंकरा रे शंकरा' हे गाणंही शेअर करण्यात आले आहे.
आपल्या प्राणाची बाजी लावून 'तानाजी मालुसरे' यांनी शिवरायांचा कोंढाणा किल्ला जिकंला होता. त्यांची हिच शौर्यगाथा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'शंकरा रे शंकरा' या गाण्यात युद्धापूर्वी तान्हाजी युद्धापूर्वी आपल्या शत्रूला आव्हान देण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात. अभिनेता सैफ अली खानचीही दमदार झलक या गाण्यात पाहायला मिळते. मेहुल व्यास यांनी हे गाणं गायलं आहे. तर, अनिल वर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.