चेन्नई: कोरोना व्हायरसच्या संकटामुळे फिल्म व्यवसायात अडथळा निर्माण झाला आहे. चेन्नईतील चित्रपट दिग्दर्शक आनंदने साथीच्या आजाराच्या वेळी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किराणा दुकान सुरू केले आहे.
तामिळ चित्रपटसृष्टीत १० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या आनंद यांना पुढच्या वर्षापर्यंत देशातील चित्रपटगृहे बंद राहतील याची जाणीव झाली. त्यानंतर उपजिवीकेसाठी त्यांनी हा मार्ग शोधलाय.
बचतीचा उपयोग करून, दिग्दर्शकाने त्याच्या जवळच्या मित्राकडून इमारत भाड्याने घेतली आणि चेन्नईच्या मॉलीवाक्कममध्ये किराणा दुकान सुरू केले आहे
“लॉकडाऊन कालावधीत, मी फक्त माझ्या घरातच बंदिस्त होतो. जेव्हा मला कळले की तमिळनाडूमध्ये फक्त किराणा आणि प्रोव्हिजनल स्टोअर्स उघडली गेली आहेत, तेव्हा मी एक दुकान उघडण्याचे ठरविले,” असे आनंद म्हणाले.
" जास्त खरेदीदार मिळालेत यासाठी तेल, डाळी, तांदूळ यासह सर्व उत्पादने मी कमी किंमतीत विकत घेतो आणि याचा मला आनंद आहे," असे ते पुढे म्हणाले.