तमिळ अभिनेते बाला सिंग यांचं निधन - bala sing filmy career
बाला सिंग यांनी आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

तमिळ अभिनेते बाला सिंग यांचं निधन
चेन्नई -तमिळ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते बाला सिंग यांनी बुधवारी (२७ नोव्हेंबर) अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. बऱ्याच दिवसांपासून ते आजाराशी लढत होते. चेन्नईच्या विजय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
१९९५ साली 'अवतराम' या चित्रपटातून त्यांनी तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बरीच वर्षे राज्य केले.