महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अहंभाव बाजूला सारत एकोप्याने राहण्याचा संदेश देणारा 'शिमगा' - Konkan

कोकणातील होळी आता शिमगा या सिनेमातून दिसणार आहे...दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट १५ मार्च रोजी रिलीज होतोय...कोकणचे सण आणि संस्कृतीचे दर्शन यातून घडणार आहे...

By

Published : Mar 13, 2019, 9:27 PM IST


मुंबई - होळीचा सण जवळ आला की कोकणी माणसाला वेध लागतात ते शिंगोत्सवाचे..कोकणात होळीसोबत शिमगोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. याच विषयावर आधारित 'शिमगा' हा सिनेमा या आठवड्यात रिलीज होतोय.

राजेश श्रुंगारपुरे, भूषण प्रधान, कमलेश सावंत, विजय आंदळकर, आणि मानसी पंड्या यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच लेखन आणि दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केलंय. तर संगीतकार पंकज पडघन याने या सिनेमाला संगीत दिल आहे.

कोकणातील एका गावात शिमग्याच्या निमित्ताने रंगणाऱ्या मानापमान नाटय या सिनेमात दाखवण्यात आल आहे. विशेष म्हणजे भूषण आणि राजेश यांनी स्वतः सिनेमात आपल्या खांद्यावर घेऊन या पालख्या नाचवल्या आहेत. कोकणच्या लोकपरंपरा यानिमित्ताने सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे.

या सिनेमातील शिमगोत्सवाच गाणं सध्या चार्टबस्टर ठरलंय. येत्या शुक्रवारी रिलीज होत असलेल्या या सिनेमाच्या टीमसोबत संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..


ABOUT THE AUTHOR

...view details