मुंबई -दिग्दर्शक करण जोहर बॉलिवूडची आघाडीची स्टारकास्ट घेऊन भव्यदिव्य अशा 'तख्त' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची कथा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
'तख्त' चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षी २४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'तख्त'च्या लोकेशनचा शोध संपला, करण जोहरने शेअर केला फोटो
दरम्यान काही दिवसांपूर्वीच करण जोहरने या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा फोटो शेअर केला होता. ताजमहल समोर उभे राहून एक फोटो घेतला. हेच आपले आगामी 'तख्त' सिनेमाचे लोकेशन असणार असल्याचे त्याने सांगितले होते.