मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप अलिकडेच एका फोटोमुळे चर्चेत आली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यामुळे तिने तो फोटो डिलिट करून चाहत्यांची माफी मागितली आहे.
ताहिरा सध्या तिच्या मुलांसोबत कामातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने गौतम बुद्धांच्या पुतळ्यावर बसुन फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे तिला नेटक्यांनी धारेवर धरले. तिला बऱ्याच टीकांना सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर तिने नंतर तो फोटो काढून टाकला.