मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी? बायोपिकवर दिली प्रतिक्रिया - Taapsee Pannu on mitali raj biopic
तापसी 'मिशन मंगल', 'बदला', 'गेम ओव्हर', 'सांड की आँख' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सांड की आँख' या चित्रपटात तिने आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेची कलाविश्वात प्रशंसादेखील झाली.
मिताली राजच्या भूमिकेत दिसणार तापसी? बायोपिकवर दिली प्रतीक्रिया
मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु सध्या तिच्या 'सांड की आँख' या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या टीमने यशाचा आनंदही साजरा केला. आता तापसी ही महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. याबाबत तापसीने प्रतिक्रिया दिली आहे.