मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट निर्माते अनुराग कश्यप 'दोबारा' नावाच्या नव्या थ्रीलरसाठी एकत्र आले आहेत. हा चित्रपट विश्वातील काळाच्या प्रवासाबद्दल भाष्य करतो.
गुरुवारी या चित्रपटाचा एक इंटरेस्टिंग टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये तापसी आणि अनुराग दोघांचा समावेश होता. टीझरमध्ये चित्रपटाचे शीर्षक "2:12 " किंवा हिंदीमध्ये "दोबारा" असे आहे.
तिच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाविषयी बोलताना, आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली: “हा एक प्रकारचा थरारक चित्रपट ठरला जाणार आहे. हे अनोखे असणार आहे कारण हा चित्रपट अनुरागने दिग्दर्शित केला आहे आणि एकताने त्याला पाठिंबा दर्शविला आहे.
''मनमर्जियां चित्रपटानंतर माझा अनुरागसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे मला याकडून खूप अपेक्षाही आहेत,'' असे ती म्हणाली.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले, ''आमचा दोबारा विषयीचा दृष्टीकोन खूपच फ्रेश असून, प्रेक्षकांसाठी नवीन कथा आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.''