मुंबई -अभिनेत्री तापसी पन्नु यावर्षी मिशन मंगल', 'सांड कि आँख' यांसारख्या चित्रपटात झळकली. आता ती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'थप्पड' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करून तापसीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'थप्पड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, तापसीने शेअर केला फोटो - 'थप्पड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' चित्रपटानंतर तापसी पुन्हा एकदा अनुभव सिन्हा यांच्यासोबत एकत्रीत आली आहे.
अनुभव सिन्हा यांच्या 'मुल्क' चित्रपटानंतर तापसी पुन्हा एकदा अनुभव सिन्हा यांच्यासोबत एकत्रीत आली आहे. पुढच्या वर्षी २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महिलांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. तापसीची यामध्ये मुख्य भूमिका आहे. टी-सीरिज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
या चित्रपटांशिवाय तापसी महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्येही झळकणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून तापसीने या बायोपिकबाबत माहिती दिली होती.