मुंबई -अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'सांड की आँख' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये भूमी आणि तापसी दोघींचाही अनोखा अंदाज पाहायला मिळतोय.
शार्प शूटर दादीच्या भूमिकेत तापसी - भूमीचा अनोखा अंदाज, सांड की आँखचा टीजर प्रदर्शित - anurah kashyap
या चित्रपटात भूमी आणि तापसी दोघीही आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत. शार्प शूटर दादी अशी ओळख असलेल्या चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या भूमिकेत दोघींचीही दमदार झलक या टीजरमध्ये पाहायला मिळते.
या चित्रपटात भूमी आणि तापसी दोघीही आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत. शार्प शूटर दादी अशी ओळख असलेल्या चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या भूमिकेत दोघींचीही दमदार झलक या टीजरमध्ये पाहायला मिळते. तापसीने हा टीजर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'यो तो बस सुरुआत है, क्युँकि तन बुढ्ढा होवे है मन बुड्ढा ना हौवै' असे कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे.
तुषार हिरानंदानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.