'नाद नको दादा, पाठीशी बाय माझी... स्वीटी!' असे मजेदार शब्द असलेलं "स्वीटी सातारकर" या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. उडत्या चालीचं ताल धरायला लावणारं हे गाणं सोशल मीडियावर हिट होत आहे.
'नाद नको दादा, पाठीशी बाय माझी... स्वीटी!', 'स्वीटी सातारकर'चं गाणं लाँच - या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक
'स्वीटी सातारकर' या चित्रपटात अत्यंत अतरंगी अशा स्वीटी या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटातलं उडत्या चालीचं ताल धरायला लावणारं गाणं सोशल मीडियावर हिट होत आहे.
मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून ध्रुव दास, सतीश जांभे आणि स्वरूप स्टुडिओज हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे.
चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. तर नकाश अझीझ आणि भारती माधवी यानी हे गाणं गायलं आहे. अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का? अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचा टीजर आणि धमाकेदार गाण्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. येत्या २८ फेब्रुवारीला "स्वीटी सातारकर" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.