कोलकाता: सुशांतसिंग राजपूत अभिनीत दिल बेचार या चित्रपटात बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने काम केले आहे. सोशल मीडियावरन तिने सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय.
सोशल मीडियात जाताना तिने एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सुशांत आणि स्वस्तिका एकत्र बॉलिवूडच्या जुन्या हिट गाण्यावर थिरकताना दिसतात.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ शेअर कताना तिने लिहिलंय, ''त्याने किझीसोबत डान्स केला आणि नंतर त्याने माझ्यासोबतही डान्स केला...मला या प्रकारे त्याला आठवणीत ठेवायचे आहे.''