मुंबई- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान या विषयावरुन अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसंझ यांच्या ट्विटर युध्द सुरू झाले आहे. आता यात दिलजीतच्या बाजूने अभिनेत्री स्वरा भास्कर मैदानात उतरली आहे.
खरं तर, कंगना रणौतने अलीकडेच शेतकऱ्यांच्या निदर्शनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेबद्दल ट्विट केलं होतं, यावर दिलजीत दोसंझ याने तिला अशी विनंती केली की कोणीही इतका आंधळा होऊ नये. दिलजितच्या या ट्विटनंतर, दोन्ही कलाकार एकमेकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ लागले आणि चांगले-वाईट बोलू लागले. या संदर्भात स्वरा भास्करने ट्विट केले आहे: "दिलजित दोसंझ एक स्टार आहे. खरंच 'दिल जीत' लेस." असे स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये म्हणत दिलजीतची पाठराखण केली आहे.