मुंबई -गणेशोत्सवानिमित्त बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री स्वरा भास्कर देखील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र, दर्शन घेतल्यानंतर परत येताना तिला अनवाणी पायानंच परतावं लागलं. कारण, तिची चप्पल यावेळी चोरीला गेली. याची माहिती खुद्द स्वरानेच सोशल मीडियावर शेअर केली.
दर्शनाला जाण्यापूर्वी स्वराने काही फोटो शेअर केले होते. यामध्ये तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल देखील पाहायला मिळते. मात्र, दर्शन घेऊन आल्यानंतर तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला. 'दर्शनाला गेल्यानंतर चप्पल चोरीला गेली नाही, तर काय दर्शन घडलं', असं मजेदार कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिलं आहे.