कोरोना काळात मानसिक आरोग्याला अतीव महत्व प्राप्त झाले. मानसोपचारतज्ज्ञ आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांच्याकडे रूग्णांची रीघ लागली होती. स्वप्ना पाटकर ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून वांद्रे पश्चिम येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. तिने क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट बनावट पीएचडी पदवी मिळविण्याच्या आणि तिचा वापर इथल्या इस्पितळात नोकरीसाठी केल्याच्या आरोपाखाली बनावट आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
मध्यंतरीच्या काळात स्वप्ना पाटकर हिने एका राजकीय पक्षाचे नेते व प्रवक्ते यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या आणि राज्य-गृह खाते त्यांना रिस्पॉन्स देत नव्हते असे सांगितले होते. स्वप्ना हिने मराठी चित्रपट ‘बाळकडू’ची निर्मिती केली होती. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला मूर्त रूप देणारा होता ज्यात उमेश कामत आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात बाळासाहेबांचा आवाज चेतन सशीतल यांचा होता. निर्माती स्वप्ना पाटकर हिने उपनगरी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ४१९ (व्यक्तिरेखेद्वारे फसवणूक), ४२० (चीटिंग) आणि ४६७ (फसवणूकीच्या उद्देशाने चीटिंग) संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वप्ना पाटकर २०१६ पासून वांद्रे (पश्चिम) येथील एका प्रमुख रुग्णालयात क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होती, असे त्यांनी सांगितले.