अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने एक जुना फोटो शेअर केलाय त्याची सध्या खूप चर्चा आहे. ती १७ वर्षाची असतानाचा हा ग्रुप फोटो आहे. तिचे शिक्षण दिल्लीच्या एयरफोर्स गोल्डन जुबली इन्स्टीट्यूटमध्ये झाले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, 'सर्वांना गुड मॉर्निंग, हे पाहा मला काय मिळाले...१९९२ -९३ च्या वर्गातील हा फोटो.'
सुष्मिता सेनच्या शाळेतील फोटोची सध्या सुरू आहे चर्चा - Sushmita Sen in school group photo
सुष्मिता सेनने शालेय काळातील एक ग्रुप फोटो शेअर केलाय. त्याला भरपूर कॉमेंट्स मिळत आहेत.
सुष्मिताने पुढे लिहिलंय, 'या ओळीत उभी राहिली आहे. त्यावेळी माझे वय १७ वर्षांचे होते आणि आत्मविश्वासही कमी होता. पुढच्या वर्षी माझे आयुष्यच बदलून जाणार आहे याचा अंदाज मला नव्हता. माझी पर्सनॅलिटी आणि माझी चॉईसही बदलेल असेही वाटले नव्हते. याला माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट समजते. तुमच्या जीवनात टर्निंग पाईंट येतो आणि तो वेगळ्या पद्धतीने येतो.'
सुष्मिताच्या या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत. सध्या सुष्मिता मालदिवच्या सुट्टीवर आहे. तिच्या मुली रिनी, आलिशा आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबत ती सुट्टीचा आनंद घेत आहे.