महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भावाच्या लग्नात सुष्मिता-रोहमन शॉलचा रोमॅन्टिक डान्स, व्हिडिओ व्हायरल - social media

सुष्मिताने संगीत सोहळ्याचे काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये राजीव आणि चारुचादेखील डान्स पाहायला मिळतोय. यावेळी सुष्मिता आणि रोहमन दोघेही खूप आनंदी दिसत होते.

भावाच्या लग्नात सुष्मिता-रोहमन शॉलचा रोमॅन्टिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jun 20, 2019, 10:45 AM IST

मुंबई -अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन अलिकडेच टीव्ही अभिनेत्री चारू ओसापा हिच्याशी लग्नबेडीत अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या संगीत सोहळ्यामध्ये सुष्मिताच्या कुटुंबीयांना धमाल मस्ती केली. दरम्यान सुष्मिता आणि रोहमन शॉल यांचा एक रोमॅन्टिक डान्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरुन लाईक केले आहे.

भावाच्या लग्नात सुष्मिता-रोहमन शॉलचा रोमॅन्टिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

सुष्मिताने संगीत सोहळ्याचे काही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये राजीव आणि चारुचादेखील डान्स पाहायला मिळतोय. यावेळी सुष्मिता आणि रोहमन दोघेही खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही राजीवच्या लग्नात धमाल केली.

राजीव आणि चारूने १६ जून रोजी गोवा येथे लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details