महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला केले 'मेमोरलाइज्ड', फॉलोअर्सची वाढली संख्या - सुशांतच्या इन्स्टाग्राम उकाऊंट 'मेमोरलाइज्ड

सुशांतने खूपच कमी वयात जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. आता त्याच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी इन्स्टाग्रामने त्याचे अकाऊंट मेमोरलाइज्ड' कॅटेगरीमध्ये टाकले आहे. याचा अर्थ एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या उकाऊंटला जपून ठेवणे.

Sushant
सुशांतसिंह

By

Published : Jun 19, 2020, 8:38 PM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याने हे पाऊल का उचलले याचा शोध अद्याप लागलेला नाही. याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.

दरम्यान, सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामने त्याचे अकाऊंट मेमोरलाइज्ड' कॅटेगरीमध्ये टाकले आहे. याचा अर्थ एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या अकाऊंटला जपून ठेवणे. त्याच्या चाहत्यांसाठी हे आवश्यक आहे. कारण अजूनही त्यांना तो गेला आहे यावर विश्वास बसत नाही.

सुशांतसोबत काम करणारी त्याची टीमही आठवणी जागवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी सेल्फम्यूजिंग नावाची एक वेबसाईट सुरू केली आहे. याच्यात सुशांतचे काम, विचार, कोट्स, अभ्यासाशी संबंधित पोस्ट टाकण्यात येतील. त्याच्या आठवणी कायम रहाव्यात यासाठी या टीमचा हा प्रयत्न असेल.

सुशांतसिंहचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर १५ जून रोजी मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले होते. काल त्याच्या अस्थींचे पाटण्यातील गंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details