महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत प्रकरण ठरणार बिहार निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा - Bihar Election campaign

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा राजकीय लाभ उचलण्याचा बिहारच्या सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र ते ही बाब उघडपणे मान्य करीत नाहीत. सुशांतला न्याय देण्यासाठी मोहिम चालू असून निवडणुका हा योगायोग असल्याचे ते म्हणतात. यासाठी सुशांतचे स्टीकर्स आणि इतर प्रचार साहित्याचा निवडणूक चिन्हांसह वापर केला जात आहे.

Sushant's case
सुशांत प्रकरण

By

Published : Sep 7, 2020, 8:05 PM IST

पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्यासाठी मुद्दे शोधण्यास सुरवात केली आहे. सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण या निवडणुकीत राजकीय पक्षांचे 'शस्त्र' ठरणार आहे.

सर्व राजकीय पक्ष यास निवडणूक किंवा राजकीय मुद्दा मानण्यास नकार देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचे आर्ट अॅण्ड कल्चर सेल सुशांतला न्याय मिळावा, या मागणीसाठी बजेट स्टिकर्स आणि पोस्टर्स वाटप करीत आहे.

सुशांतचे चित्र असलेल्या स्टिकर्समध्ये 'जस्टिस फॉर सुशांत' लिहिलेले आहे आणि 'ना भूले है, ना भूलेंगे'. या स्टिकरमध्ये भाजपच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेखही आहे. सुशांत हा त्यांच्यासाठी कधी राजकीय विषय नव्हता आणि आजही नाही. अभिनेत्याच्या मृत्यूपासून न्यायाची मागणी करण्याची मोहीम सुरू आहे.

सेलचे संयोजक वरुणकुमार सिंग म्हणतात, "जुलैपासून 25 हजार कार स्टिकर्स छापले असून बर्‍याच जिल्ह्यांत वितरित केले जात आहेत. याशिवाय मुखवटे देखील वितरीत केले गेले आहेत. जून, जुलैपासून ही मोहीम सुरू आहे."

ते म्हणाले की, याला राजकीय मुद्दा म्हणणे चुकीचे आहे. विधानसभा निवडणुका होणार हा निव्वळ योगायोग आहे. ते म्हणाले की, सुशांतला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही सुरुवातीपासूनच मोहीम राबवित आहोत.

उल्लेखनीय आहे की, भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, खासदार रामरुकपाल यादव यांनी सुशांतच्या पाटणा येथील निवासस्थानी त्याच्या वडिलांची भेट घेतली भेट दिली.

दुसरीकडे, आरजेडी नेते तेजस्वी यादव हे देखील बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या मृत्यूबद्दल सांगत आहेत की, आरजेडीने सर्वप्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाविषयी चौकशी करण्याची मागणी केली.

आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी हेदेखील राजकीय मुद्दा मानत नाहीत. ते म्हणाले की, तेजस्वी यादव हे पहिले नेते होते जे सुशांतच्या घरी पोहोचले आणि त्यांच्यासाठी न्यायाची मागणी केली, पण सरकारच्या वतीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस ४४ दिवसांनी करण्यात आली.

येथे भाजपचे मित्रपक्ष जदयूचे नेतेदेखील या प्रकरणाला राजकीय मुद्दा मानत नाहीत.

जेडीयू नेते व राज्याचे माहिती व जनसंपर्कमंत्री नीरज कुमार म्हणाले की, सुशांतला न्याय देण्याची मागणी राजकारणाशी जोडणे योग्य नाही. ते म्हणाले की, बिहार सरकारने सुरुवातीपासूनच सुशांतच्या नातेवाईकांना या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करून न्याय दिला आहे.

उल्लेखनीय आहे की पाटण्यात राहणारे बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह 14 जूनला त्याच्या मुंबई फ्लॅटमध्ये सापडला होता. सुशांतच्या वडिलांनी पाटणाच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार सरकारने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली होती. सध्या सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details