महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला 'दिल बेचारा'; सबस्क्रिप्शनशिवायही पाहता येणार.. - दिल बेचारा मोफत

सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

Sushant Singh Rajput's last film Dil Bechara is now available on hotstar for free
'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला 'दिल बेचारा'; सबस्क्रिप्शनशिवायही पाहता येणार..

By

Published : Jul 24, 2020, 10:04 PM IST

मुंबई : सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा, 'दिल बेचारा' आज ओटीटीवर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा मोफत उपलब्ध करण्यात आला आहे.

सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

सुशांतच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, मित्र मैत्रिणी आणि त्याच्या फॅन्सना देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या दिल बेचारा चित्रपटातून त्यांना आपल्या लाडक्या कलाकाराची अखेरची कलाकृती डोळे भरून पाहता येऊ शकेल. हा चित्रपट हॉलिवूडच्या गाजलेल्या 'द फ़ॉल्ट इन अवर स्टार्स' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

हेही वाचा :यशराजचा सिनेमा मिळवण्यासाठी सुशांतने नाकारला होता अनुराग कश्यपचा चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details