महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अंकितापासून वेगळं होण्याचा सुशांतला पश्चाताप, मानसोपचार तज्ज्ञांचा खुलासा - सुशांत रजपूत न्यूज

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत असून, सुशांतच्या संबंधातील सर्व लोकांची विचारपूस करत आहेत. पोलिसांनी सुशांतवर उपचार करणारे मानसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचीही विचारपूस केली. त्यांच्या माहितीनुसार, एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेशी सुशांतचे ब्रेकअप झाल्याचा सुशांतला पश्चाताप झाल्याचे केसरी चावडा यांनी सांगितले.

Sushant Singh Rajput regretted parting ways with Ankita Lokhande, says his psychiatrist
अंकितापासून वेगळं होण्याचा सुशांतला पश्चाताप

By

Published : Jun 20, 2020, 3:58 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह याने २४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात आहेत. तसेच बॉलीवूडमध्ये चालणाऱ्या घराणेशाहीवरही लोकांचा संताप व्यक्त होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत असून, सुशांतच्या संबंधातील सर्व लोकांची विचारपूस करत आहेत. पोलिसांनी सुशांतवर उपचार करणारे मानसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचीही विचारपूस केली. त्यांच्या माहितीनुसार, एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेशी सुशांतचे ब्रेकअप झाल्याचा सुशांतला पश्चाताप झाल्याचे केसरी चावडा यांनी सांगितले.

अंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर थोडे दिवस सुशांतचे व्यवस्थीत चालले होते. मात्र, काही दिवसांनी सुशांतला समजले होते की, अंकिताप्रमाणे त्याच्यावर कोणाही प्रेम करत नाही. त्यामुळे तो दु:खी असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर सुशांतच्या आयुष्यामध्ये कृती सेनन आली होती. मात्र, त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत.

मानसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वागण्यात खूप बदल जाणवत होता. सुशांतला झोप लागत नव्हती. त्याला रात्री विचित्र आवाज येत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अंकिता सुशांतपासून वेगळी झाल्याचा खूप प्रभाव त्याच्यावर पडला होता. सुशांत आणि अंकिता या दोघांनी पवित्र रिश्ता या मालिकेत सोबत काम केले होते. तेथूच त्यांचे प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. 6 वर्षाहून ज्यादा दिवस दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले होते. 2016 मध्ये ते दोघे एकमेकांपासून अलग झाले होते.

2016 ते 2020 च्या दरम्यान सुशांतने 3 कंपनी सुरु केल्या होत्या. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि त्याचा भाऊ शौविक हेही कंपनीचे सदस्य असल्याची माहिती मिळते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details