नवी दिल्ली -अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी 'दिल बेचारा' या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. सुशांतने आत्महत्या का केली याबाबतचा त्याचा निर्णय दुर्दैवी होता. परंतु, त्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या गोष्टी वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वस्तिका मुखर्जीने नुकताच प्रदर्शित झालेल्या 'दिल बेचार' या सुशांतसिंहच्या शेवटच्या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्या अगोदर त्यांनी सुशांतसोबत २०१५ मध्ये आलेल्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शीमध्येही एकत्र भूमिका केली होती.
गेल्या महिन्यात सुशांतच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून, बॉलिवूडमध्ये नातलगवाद (नेपोटिझ्म)ची चर्चा होत आहे. अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. मंगळवारी सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली.