मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनानंतर मुंबई पोलिस या प्रकरणात बारकाईने चौकशी करत आहेत. यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांची त्याच्या चार वकिलांसह शनिवारी चार तास चौकशी करण्यात आली. एका वेबलोइड अहवालानुसार, सूत्रांनी असा आरोप केला आहे की, आदित्यने केलेले वक्तव्य आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी या महिन्याच्या सुरुवातीस केलेल्या वक्तव्याच्या पूर्णपणे विरोधात आहे.
यापूर्वी असे समजले गेले होते की, भन्साळी यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, बाजीराव मस्तानी या चित्रपटात सुशांत काम करणार होता मात्र यशराज फिल्म्ससोबत असलेल्या करारामुळे हे शक्य झाले नव्हते.
भन्साळींचे म्हणणे फेटाळून लावत आदित्यने पोलिसांना सांगितले की सुशांतला बाजीराव मस्तानीसाठी निवडलंय हे यशराज फिल्मला सांगण्यात आले नव्हते. आदित्य म्हणाला, जर यशराज फिल्मसोबत करार असताना सुशांत हा धोनी चित्रपट करु शकला तर मग तो बाजीरावमध्ये का काम करु शकत नव्हता. आदित्यने पुढे सांगितल की भन्साळी यांच्या टीमच्या वतीने त्यांच्याशी सुशांतसंबंधी कोणीही संपर्क केला नव्हता.
यापूर्वी असे सांगितले गेले होते की यशराज फिल्म्सने सुशांतला गोलियां की रासलीला राम-लीला घेण्यास परवानगी दिली नव्हती, त्यानंतर भन्साळीना रणवीरला घेण्यास भाग पाडले. पण, आदित्य यांनी हे आरोप 'निराधार' म्हणत नाकारले आहेत.