मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री संजना सांघी यांचा 'दिल बेचारा' हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून या प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'दिल बेचारा' हा चित्रपट पुढच्या वर्षी ८ मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजना पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी ती 'रॉकस्टार' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या रुपात भूमिका साकारली होती.
हेही वाचा -इम्रान हाश्मीच्या 'द बॉडी'चा गुढ ट्रेलर प्रदर्शित