महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांत सिंग राजपूतची जॅकलिनसोबत धमाल, पाहा त्यांची 'ड्राईव्ह' ट्रीप - sushant singh rajput

सुशांत लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत 'ड्राईव्ह' हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सुशांत सिंग राजपूतची जॅकलिनसोबत धमाल, पाहा त्यांची 'ड्राईव्ह' ट्रीप

By

Published : Oct 5, 2019, 1:38 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांत सिग राजपूत काही दिवसांपूर्वीच 'छिछोरे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता लवकरच तो डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत 'ड्राईव्ह' हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'मखना' हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

'मखना' या गाण्यात सुशांत आणि जॅकलिनची धमाल ट्रीप पाहायला मिळते. तरुण मनसुखानी या सिनेमाचे दिग्दर्शक असून धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत हा चित्रपट तयार झाला आहे. तर, इस्रायलच्या सुंदर ठिकाणी या गाण्याचं शूटिंग झालं आहे.

हेही वाचा -सायनाच्या बायोपिकसाठी परिनीती करतेय अशी मेहनत, शेअर केला फोटो

या गाण्यात सुशांत आणि जॅकलिनची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटासाठी एकत्र आले आहे. 'ड्राईव्ह' हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे. बोमन ईरानी, पंकज त्रिपाठी आणि विभा छिब्बर यांसारखे कलाकारही या चित्रपट भूमिका साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा -प्रोस्थेटिक्स लूकमध्ये असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

ABOUT THE AUTHOR

...view details