मुंबई - 'हेट स्टोरी ३' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी सुरवीन चावला हिच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर आपल्या चिमुकलीचा एक फोटो शेअर करुन तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने तिच्या मुलीचे नाव 'इवा' असे ठेवले आहे.
काही महिन्यांपूर्वी सुरवीनने तिच्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटोही तिने शेअर केले होते. आता मुलीचा पहिला फोटो शेअर करुन घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुरवीनने २८ जुलै २०१५ मध्ये अक्षयशी इटलीमध्ये लग्न केले. सुरवीन आणि अक्षयची भेट २०१३ मध्ये एका मित्राकरवी झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले.