हैदराबाद - सुपरस्टार रजनीकांत यांना येथील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते अण्णात्थे या चित्रपटाचे शुटिंग हैदराबादमध्ये करीत होते. त्यातील काही क्रू मेंबरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर शुटिंग थांबवण्यात आले आहे. मात्र आज अचानक रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे आश्चर्य आणि काळजी व्यक्त केली जात आहे.
अपोलो रुग्णालयाचा खुलासा
अपोलो रुग्णालयाने याबात एक पत्रक प्रसिध्द केले असून रजनीकांत यांची तब्येत चांगली असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या शुटिंग सेटवरील क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यामुळे अपोलो रुग्णालयात वैद्याकिय देखरेखेखाली ते ओयसोलेशनमध्ये राहात असल्याचे म्हटलंय.
रजनीकांत हैदराबादच्या अपोलोमध्ये भरती शुटिंग क्रूला झाली होती कोरोनाची बाधा
"घोषणा: 'अण्णात्थे' शूटच्या रूटीन टेस्टिंग दरम्यान ४ क्रू मेंबर्सनी कोविड १९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि इतर क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अण्णात्थे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे,'' असे ट्विट सन पिक्चर्सने कालच केले आहे.
'अण्णात्थे' चित्रपटाचे सुरू होते शुटिंग
'अण्णात्थे' हा तमिळ अॅक्शन फिल्म आहे. चित्रपट शिव यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून कलानिथी मारन निर्मित सन पिक्चर्स या बॅनरखाली बनवला आहे. या चित्रपटात रजनीकांत, मीना, खुशबू, कीर्ती सुरेश, नयनथारा, प्रकाश राज आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह मुख्य भूमिकेत आहेत.
मे २०२० रोजी सन पिक्चर्सने घोषित केले होते ती अण्णात्थे पोंगल सणाच्यावेळी (संक्रांत) रिलीज होणार आहे. तथापि, कोविड उद्रेकानंतरच्या विलंबामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.
हेही वाचा - नवीन कोविडचा तणाव : यूकेमध्ये अडकली प्रियंका चोप्रा, 'टेक्स्ट फॉर यू'चे शूटिंग थांबले