मुंबई - अभिनेत्री सनी लिओनी सध्या आनंदात आहे. सनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डॅनियलसोबत पोज देत असल्याचे दिसून येत आहे.
तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिले आहे, "माझ्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे मी आनंदी झाले आहे." नवरा डॅनियलला ती आपला सर्वात जवळचा मित्रही मानते. पती डॅनियल वेबर आणि मुलांसह खूप आनंदी आहे अशा आशयाची ही पोस्ट आहे.
हेही वाचा -''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका
नियमितपणे सनी लिओनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याबद्दलच्या अपडेट्स शेअर करीत असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहते आणि आयुष्यातील घडामोडी सांगत असते.
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात तिला असे वाटत होते की या काळात ती भारतापेक्षा अमेरिकेत अधिक सुरक्षित असेल. सनी गेल्या सहा महिन्यांपासून लॉस एंजेलिसमध्ये राहत होती.
हेही वाचा -पाहा, काजल अग्रवालच्या हनीमूनचे पतीसोबत समुद्रातील रोमँटिक फोटो
नुकतेच सनीने मुंबईत पुनरागमन केले आहे आणि काम सुरु केले आहे. कोणत्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे याबद्दल तिने अद्याप काहीही सांगितले नाही.